पणजी - राज्यात सध्याच्या घडीला भाजपाविरोधात अनेक जण स्वातंत्रपणे निवडणूक लढवीत ( Goa Assembly Election 2022 ) आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्याने भाजपातील काही नाराजांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे सांगे.
अशी आहे लढत
सांगे मतदारसंघात खरी लढत होती ती भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी. पण, तिकीट न मिळाल्याने भाजपाचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता थेट लढत होणार आहे ती काँग्रेसचे प्रसाद गावकर ( Congress Candidate Prasad Gaokar ), भाजपाचे सुभाष फळदेसाई ( Bjp Candidate Subhash Phaldesai ) आणि अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (independent Candidate Savitri Kavalekar ) यांच्यात. 2017 साली अपक्ष निवडणूक लढणाऱ्या प्रसाद गावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. त्यांना आव्हान आहे ते भाजपाचे सुभाष फळदेसाई यांचे. पण, अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांच्या उमेदवारीने ही लढाई आता अधिकच रंगतदार होणार आहे.
माझ्या अस्तित्वासाठी मी लढतेय