महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : 40 जागांसाठी 587 उमेदवारी अर्ज दाखल; अर्जांची छाननी सुरू - Scrutiny of applications started in Goa Election

गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) पार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत 40 जागांसाठी 587 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर फक्त शुक्रवारी 254 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. आज शनिवारी 29 जानेवारीला अर्जाची छाननी सुरू करण्यात ( Scrutiny of applications started in Goa Election ) आली असून 31 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभा उमेदवारांचे अंतिम चित्र होणार आहे.

Goa Assembly Election 2022
गोवा विधानसभा निवडणूक 2022

By

Published : Jan 29, 2022, 2:45 PM IST

गोवा -राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) पार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत 40 जागांसाठी 587 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर फक्त शुक्रवारी 254 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. आज शनिवारी 29 जानेवारीला अर्जाची छाननी सुरू करण्यात ( Scrutiny of applications started in Goa Election ) आली असून 31 जानेवारी ला अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभाउमेदवारांचे अंतिम चित्र होणार आहे.

अखेरच्या दिवशी 254 जणांनी केले अर्ज दाखल -

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 जानेवारीपासून सुरु झाली होती. काही पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पहिल्या काही दिवस थंडावली होती. मात्र, सर्वच पक्षांनी आपली उमेदवार अंतिम यादी 26 जानेवारीला घोषित केली. त्यामुळे 27 जानेवारीला मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतांना 262 जणांनी उमेदवारी दाखल केली. तर, शुक्रवारी अखेरच्या दिवशी 254 जणांनी आपला अर्ज दाखल केला.

भाजपची ताकद पणाला -

पहिल्यांदाच सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीने 37 जागांवर काँग्रेस तर 3 जागांवर गोवा फॉरवर्ड निवडणूक लढवीत आहे. तृणमूल व महाराष्ट्र वादी गोमंतक पक्ष युतीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर आम आदमी आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही युतीत निवडणूक लढवीत आहे.

हेही वाचा -Goa Election 2022 : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाची अखेर निवडणुक रिंगणातून माघार

ABOUT THE AUTHOR

...view details