पणजी -गोवा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु ( Goa Assembly Election 2022 ) झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर दारू विक्री करणारी दुकाने, बार, क्लब यांनी रात्री 11 पर्यंतच विक्री करण्याची मुभा देण्यात ( Goa Ban Liquor ) आली आहे. याबाबत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून निर्देश दिले आहेत.
गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) होणार आहे. राज्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक मद्यधुंद होऊन कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करतात, याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.