पणजी -गोवा कला आणि साहित्य महोत्सव 2019 चे उद्घाटन प्रसिद्ध लेखक हरीश त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रिया रामाणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे 5 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी चोराओ येथे सलील चतुर्वेदी यांचे कविता वाचन, कार्मोनाचे लेखक तथा कलाकार डॉ. साविआ व्हिएगस यांच्या अधिकृत कलाकृतीचे अनावरणही करण्यात येणार आहे. एक देश, एक आवाज या विषयावर यावेळी परिसंवाद होणार असून यामध्ये नरेश फर्नांडिस, मेघालयातील पेट्रीसिया मुखिम, समार हलेरनकर आणि अमिता काणेकर यांचा सहभाग आहे. तिघेही मूळचे गोमंतकीय आहेत.
हेही वाचा - ..जर हा गुन्हा असेल तर पुन्हा-पुन्हा आणि प्रत्येक जन्मात 'अशीच' शपथ घेईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गोवा आर्ट अँड लिटरेचर फेस्टिव्हलची (गोवा कला आणि साहित्य महोत्सव) म्हणजेच गल्फ 2019 भारत आणि जगातील टॅलेंटला घेऊन मायदेशी म्हणजेच गोव्यात परतत आहे. ही या महोत्सवाची दहावी आवृत्ती असणार आहे. भारतातील सर्वात लहान राज्याशी असणाऱ्या संबंधावर विशेष भर देण्यात येणार आहे.
गेल्या दशकाच्या कालावधीत, या अनोख्या, स्वदेशी आणि स्वयंसेवकांनी चालविलेल्या बौद्धिक महोत्सवाचे नाव जगातील मोठ्या महोत्सवात प्रस्थापित केले आहे. या महोत्सवाचे सल्लागार दामोदर मावझो आणि विवेक मेनेझिस यांनी या महोत्सव उभा करण्यात ज्यांनी हातभार लावला आहे, अशा मान्यवरांना इंटरनॅशनल सेंटर, गोवा येथे 5 ते 7 डिसेंबरदरम्यान एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी goaartlitfest.com या वेबसाईटवर तुम्ही तुमचे नाव नोंदवू शकता.