महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गांधी जयंती: भाजपतर्फे राज्यभर 'गांधी संकल्प पदयात्रा', मुख्यमंत्री सावंत यांनीही घेतला सहभाग - goa Legislative Assembly

पणजीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयापासून सुरु झालेल्या पदयात्रेचा समारोप आझाद मैदानावर झाला. यामध्ये परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी 'भारत माता की जय' घोषणेने शहर दणाणून सोडले होते.

गांधी जयंती: भाजपतर्फे राज्यभर 'गांधी संकल्प पदयात्रा', मुख्यमंत्री सावंत यांनीही घेतला सहभाग

By

Published : Oct 2, 2019, 10:02 PM IST

पणजी - महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने गोवा प्रदेश भाजपने आज (बुधवार) सर्व विधानसभा मतदारसंघात ' गांधी संकल्प पदयात्रा' आयोजित केली होती. पणजीतील पदयात्रेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार आतानसिओ मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर यांच्यासह पणजी मंडळ, भाजप मंडळ पदाधिकारी सहभागी झाले होते.

पणजीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयापासून सुरु झालेल्या पदयात्रेचा समारोप आझाद मैदानावर झाला. यामध्ये परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी 'भारत माता की जय' घोषणेने शहर दणाणून सोडले होते.

हेही वाचा - गोव्यात बुधवारपासून एकवेळ वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'सत्य, स्वभाषा, स्वधर्म, समभाव आणि स्वसंकल्प हे महात्मा गांधी याचे विचार समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ही संकल्प यात्रा आहे. देश स्वतंत्र होऊन ७० हून अधिक वर्षे झाली. तरीही गांधींचे विचार सर्वांपर्यंत पोहचविले गेले नाहीत. त्यामुळे यासाठी सदोदित कार्यरत राहिले पाहिजे.'

गांधी जयंती: भाजपतर्फे राज्यभर 'गांधी संकल्प पदयात्रा', मुख्यमंत्री सावंत यांनीही घेतला सहभाग

या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत, आमदार आणि महापौर यांच्या उपस्थितीत पणजी महानगरपालिकेच्या 'प्लास्टिक विरोधी अभियाना'ची घोषणा करण्यात आली. तसेच उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा - पणजी: पर्यावरण रक्षणासाठी राष्ट्रीय महामार्गानजीक निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details