पणजी- विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडावे. यासाठी गुरूवारी सायंकाळी पणजीत गोवा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे मतदार जागृतीसाठी मोटारसायकल फेरी काढण्यात आली.
पणजी पोटनिवडणुकीत बुथस्तरीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या मोटारसायकल फेरीला उत्तर गोव्याचे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी झेंडा दाखवला. यावेळी पणजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. उपस्थित होते.