महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजामुळे गोव्याची संस्कृती टिकून राहिली - डॉ प्रमोद सावंत - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच गोव्याचे वैभव आणि संस्कृती टिकून राहिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत केले.

Dr. Pramod Sawant
डॉ प्रमोद सावंत

By

Published : Dec 6, 2021, 7:44 AM IST

पणजी -छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच गोव्याचे वैभव आणि संस्कृती टिकून राहिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ( Chief Minister of Goa. Dr. Pramod Sawant ) यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत केले.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे भाषण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ स्थापन करण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून गोव्याचा वैभव आणि संस्कृती टिकून राहिल्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. ते शनिवारी अखिल भारतीय कोंकण प्रतांच्या अधिवेशनात बोलत होते.शनिवार आणि रविवारी हे दोन दिवशीय अधिवेशन गोव्यात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या लावून धरल्यात. शनिवारी रात्री पणजीतील आझाद मैदानावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details