महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्यला लागलेल्या आगीत अधिकाऱ्याचा मृत्यू - लेफ्टनंट कमांडर डी.एस.चौहान

जहाजाला आज (शुक्रवार) सकाळी कारवार (कर्नाटक) बंदरात प्रवेश करत असताना आग लागली होती.

लेफ्टनंट कमांडर डी.एस.चौहान

By

Published : Apr 26, 2019, 9:46 PM IST

पणजी- भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य जहाजाला आज (शुक्रवार) सकाळी कारवार (कर्नाटक) बंदरात प्रवेश करत असताना आग लागली. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करत आग आटोक्यात आणली. आगीमुळे जहाजावर पसरलेल्या धुरामुळे गुदमरून एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

लेफ्टनंट कमांडर डी.एस.चौहान यांच्या नेतृत्वाखालील चमूने जहाजावरील आग विझवण्यात आली आहे. मात्र, आगीमुळे जहाजावर पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी.एस चौहान बेशुद्ध झाले. त्यांना कारवार येथील आयएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. नौदलाकडून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details