पणजी -डॉ. प्रमोद सावंत सरकारचे ( Dr Pramod Sawant Government Department Allocation ) खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. बहुचर्चित असणाऱ्या खातेवाटपात अनेकांना धक्का, तर अनेकांना महत्त्वाची खाती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या डॉ. विश्वजित राणे ( Dr Vishvajit Rane ) यांना आरोग्य नगर विकास तसेच महिला व बालकल्याण खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे.
कोणाला कोणते खाते? -मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचे गृह आणि अर्थखाते आपल्याकडे ठेवले असून डॉ. विश्वजित राणे यांना आरोग्य नगर विकास व नगर नियोजन यासोबत महिला व बालकल्याण तसेच वनखात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर बाबूश मोन्सेरात यांना महसूल कामगार व कचरा व्यवस्थापन पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. म्हविन यांना वाहतूक उद्योग पंचायत व शिष्टाचार खाते देण्यात आले आहे. रवी नाईक कृषी हस्तकला व नागरी पुरवठा सहकार खाते देण्यात आले आहे. निलेश काब्राल यांना सार्वजनिक बांधकाम पर्यावरण व कायदा खात्याचा पदभार सोपविण्यात आला. रोहन खवटे यांना पर्यटन माहिती तंत्रज्ञान खाते देण्यात आले, गोविंद गावडे यांना क्रीडा कला आणि सांस्कृतिक खात्याचा पदभार देण्यात आला आहे.