पणजी - राज्य सरकारच्या गरीब कल्याण संमेलनात महिलेवर रेशन कार्ड दाखवून जेवण मागण्याची नामुष्की आली होती. रेशन कार्ड दाखवूनही महिलेला खाद्य मिळण्यास नकार दिला गेला. यावेळी त्या महिलेचे डोळे पाणवले होते.
मंगळवारी सकाळी राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गरीब कल्याण संमेलनात ( poor welfare meeting ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी देशाला संबोधित केले. मात्र गोवा सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या गरीब संमेलन कार्यक्रमात एका भुकेल्या महिलेला खाद्याचा पास मिळण्यासाठी चक्क रेशन कार्ड दाखवून खाद्याचा पाकीट मागण्याची वेळ आली.
गरीब कल्याण संमेलनात महिलेवर रेशन कार्ड दाखवून जेवण मागण्याची नामुष्की महिला करत होती वणवणी - ही महिला सकाळपासून उपाशी होती. नाष्टाचे पॉकिट वाटणार आंकडे वेळोवेळी मागणी करूनही तिला नाष्टा न मिळाल्यामुळे आपले रेशन कार्ड दाखवून खाद्य मागण्याची नामुष्की ओढवली होती. वेळो-वेळी नाश्ता वाटणाऱ्यांकडे मागणी करून ही महिला मेटाकुटीला आली होती. वितभर पोटाची खळगी भागवण्यासाठी आणि आपली भूक शमवण्यासाठी ही महिला नाश्ता वाढणाऱ्यांकडे एका खाद्याची पाकिटाची विनवणी करत होती. मात्र सरकारच्या प्रतिनिधींनी तिची दखल न घेता तिच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी महिलेचे डोळे पाण्याने डगमगले होते. या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी काढला होता. यामुळे राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात ओरड उठतांना दिसत आहे.
हेही वाचा -Goa CM On Conversion : 'पावसाळी अधिवेशनात धर्मांतरण बंदीचा कायदा आणणार'