महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'म्हादई'बाबत कोणतीही तडजोड करू देणार नाही : दिगंबर कामत - गोवा न्यूज

काँग्रेस म्हादई नदीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करू देणार नाही, असे मत गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

दिगंबर कामत

By

Published : Nov 9, 2019, 5:05 PM IST

पणजी- काँग्रेस म्हादई नदीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करू देणार नाही, असे मत गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. तसेच सध्या दोनापावल समुद्रात असलेले नाफ्ताने भरलेल्या जहाजाबाबत श्वेत पत्रिकेद्वारे सरकारने लोकांच्या मनातील शंखा दूर करावी, अशी मागणीही केली.

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालाचा आदर; पृथ्वीराज चव्हाणांचे मत

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके आदी उपस्थित होते.

'म्हादई'बाबत कोणतीही तडजोड करू देणार नाही : दिगंबर कामत

कामत म्हणाले की, म्हादई पाणी वाटपावरून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तिन्ही राज्ये न्यायालयात गेली आहेत. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देण्यात आलेले पत्र बेकायदा आहे. म्हणून केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने ते रद्द करावे. यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्याचे मंत्री अथवा पंतप्रधान यांच्याशी चर्चा करून गोव्यावरी अन्याय दूर करावा. मात्र, याबाबत काँग्रेस कोणत्याही प्रकारची तडजोड करू देणार नाही. तसेच राजकारण ही करू शकत नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत नेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी झालो होतो.

दोनापावल येथील समुद्रात अडकलेल्या जहाजावर बोलताना कामत म्हणाले, नाफ्ता गोव्यातील कोणत्याही कंपनीत वापरला जात नाही. तरीही तो गोव्यात कोणी आणि का आणला? तो कोणाला दिला जाणार होता? मुरगाव बंदरात कसा पोहचला? एमपीटीने त्याला विरोध का केला नाही? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, यासाठी सरकारने त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी कामत यांनी यावेळी केली.

हेही वाचा -अयोध्येचा निकाल ऐकायला बाळासाहेब हवे होते - राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी दोडामार्ग विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : चोडणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका शिवसेना प्रमुख बाबुराव धुरी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तेथे जमीन खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तसेच दोडमार्ग तालुका गोव्यात विलिनीकरण करण्याबाबत काहींकडून चर्चा सुरू आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या संपत्ती खरेदीबाबत बोलायचे नाही. परंतु, विलिनीकरणाबात गोवा सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी केली. तसेच नाफ्ता वाहक जहाजाची पाहणी गोव्याचे बंदर आणि कप्तान मायकल लोबो यांनी या जहाजाची पाहणी केली, हे चांगलेच आहे. परंतु, त्यांनी त्याबरोबरच हटवण्यासाठी कृती करावी, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details