महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या धर्मेश सगलानींना अखेर जामीन मंजूर - Dharmesh Sagalani bail

काँग्रेस नेते धर्मेश सगलानी ( Dharmesh Sagalani granted bail ) यांना 50 लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 50 हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला.

Dharmesh Sagalani granted bail
धर्मेश सगलानी जामीन

By

Published : Apr 13, 2022, 10:41 AM IST

पणजी (गोवा) -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात साखळी मतदारसंघात निवडणूक लढविणार्‍या प्रतिस्पर्धी उमेदवार तथा काँग्रेस नेते धर्मेश सगलानी ( Dharmesh Sagalani granted bail ) यांना 50 लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 50 हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला.

माहिती देताना धर्मेश सगलानी

हेही वाचा -Stock Market Update: शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स 349.66 अंकांनी वर

फरीदाबाद हरियाणा येथे राहणाऱ्या अंकित जजोडिया यांनी अक्षय पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यात धर्मेश सगलानी, राजेश कुमार, शशांक सिंग, मनीष जैन आणि तीन बाउन्सरने आपल्याला 17 डिसेंबर 2019 रोजी मनीष जैन यांच्या बांबोली येथील बंगल्यात कोंडून 50 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी सगलानी यांच्यासह अन्य आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होती.

सगलानी यांनी साखरी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. त्यात सगलानी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर कट्टर आव्हान उभे केले होते. निवडणुकीच्या अंतिम फेरीपर्यंत ते विजयी होतील असा दावा सगळ्यांकडून करण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही मताने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला.

हेही वाचा -Suicide in Karnataka : पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या राष्ट्रीय सचिवचा संशयास्पद मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details