महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Reply To Priyanka Gandhi : प्रियांका गांधींच्या रोजगारावरील आरोपाला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर, म्हणाले..

देशात सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi Spoke About Employment ) यांनी केले होते. त्यांच्या या आरोपाला भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Reply To Priyanka Gandhi ) यांनी उत्तर दिले आहे.

Priyanka Gandhi Spoke About Employment
Priyanka Gandhi Spoke About Employment

By

Published : Feb 8, 2022, 12:40 AM IST

Updated : Feb 8, 2022, 2:00 AM IST

पणजी -देशात सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi Spoke About Employment ) यांनी केले होते. त्यांच्या या आरोपाला भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Reply To Priyanka Gandhi ) यांनी उत्तर दिले आहे. देशातील सर्वात जास्त बेरोजगारी गोव्यात नसून राजस्थानमध्ये असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच या गोष्टीकडे न लक्ष देता गोव्याबद्दल असे बोलणे म्हणजे गोवेकरांचा अपमान आहे. अशा पद्धतीने त्यांना गोव्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही. प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा राजस्थानवर बोलावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी -

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी काल गोव्याच्या ( Priyanka Gandhi In Goa ) दौऱ्यावर होत्या. प्रियंका गांधी पहिल्यांदाच गोव्यात प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार ( Priyanka Gandhi Critisize Congress ) टीका केली. ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांसाठी नाही, तर गोव्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. साधन समृद्धी, नैसर्गिक सुंदरता आणि व्यवसायांमध्ये हे राज्य श्रीमंत आहे. असे असतानाही बेरोजगारीत या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भाजपाचे प्रत्यूत्तर -

यावरून गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गोव्याचे प्रभारी आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रियंका गांधी यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. यासोबत भाजपा नेते सी. टी. रवी यांनीही प्रियंका गांधीवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात ४० टक्के महिलांना उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसने गोव्यात मात्र, केवळ १ टक्के महिलांना उमेदवारी का दिली, असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : रुग्णसंख्या घटली; सोमवारी राज्यात सहा हजार कोरोनाबाधित, 24 जणांचा मृत्यू

Last Updated : Feb 8, 2022, 2:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details