महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिल्लीतील व्यापारी खून प्रकरणातील संशयितांना गोवा पोलिसांकडून अटक - crime news

नवी दिल्लीतील प्रकाश मोहल्ला येथील व्यावसायिक पांडे यांचा 29 फेब्रुवारी 2020 रोजी खून झाला होता. त्याची तक्रार तेथील अमर कॉलनी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर गोवा पोलिसांना प्राप्त माहितीच्या आधारे या प्रकरणीतील मुख्य संशयित आरोपीसह अन्य दोघांना पोलिसांनी बाघा येथून ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

delhi-murder-case-accused-arrested-by-goa-police
delhi-murder-case-accused-arrested-by-goa-police

By

Published : Mar 6, 2020, 10:53 AM IST

पणजी- नवी दिल्लीतील व्यावसायिक पवन पांडे यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीसह अन्य दोन संशयितांना कळंगुट-गोवा पोलिसांनी उत्तर गोव्यातील बागा येथून ताब्यात घेतले आहे. साहिल हुसेन (22 वर्षे, संगम विहार, नवी दिल्ली) असे मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा-मलंगगडाच्या डोंगरावर वणवा; हजारो झाडे जळून खाक

नवी दिल्लीतील प्रकाश मोहल्ला येथील व्यावसायिक पांडे यांचा 29 फेब्रुवारी 2020 रोजी खून झाला होता. त्याची तक्रार तेथील अमर कॉलनी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर गोवा पोलिसांना प्राप्त माहितीच्या आधारे या प्रकरणीतील मुख्य संशयित आरोपीसह अन्य दोघांना पोलिसांनी बाघा येथून ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरिक्षक नोलास्को रापोझ, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, पोलीस शिपाई विनय श्रीवास्तव, आकाश नाईक आणि राहुल रामनवार यांच्या चमूने केली. त्यानंतर अटक केलेल्या संशयितांना दिल्ली पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले असून त्यांची दिल्लीला रवानाही करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details