महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चौकीदारांनी आमचा आमदार चोरून नेला, आता आम्ही गप्प बसणार नाही - दीपक ढवळीकर

पक्षांतराला मगोचा कायम विरोध राहिला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असे दीपक ढवळीकरांनी म्हटलं आहे.

दीपक ढवळीकरांचा भाजप उमेदवारांना पराभूत करण्याचा ध्यास

By

Published : Apr 20, 2019, 8:53 AM IST

पणजी- जनता पाच वर्षांसाठी सरकार निवडून देते. मात्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करून जनतेवर अन्याय करतात. ते रोखण्यासाठी मगोची लढाई आहे. याविरोधात न्यायालयात गेलो परंतु, न्याय न मिळाल्याने आता निवडणुकीच्या माध्यमातून लोकन्यायालयात जात आहोत, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून यामध्ये मगोने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या गोवा सरकारमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु, सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा मतदारसंघातून काँग्रेस आमदार म्हणून निवडून येत भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्यावर मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर ठाम राहिले. त्याबरोबरच मगोचे दोन आमदार स्वतंत्र गट तयार करत भाजपात दाखल झाले. त्यामुळे सुदिन यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर मगोने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये बदल करत लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला.

दीपक ढवळीकरांचा भाजप उमेदवारांना पराभूत करण्याचा ध्यास

तर म्हापसा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणि मांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आणि शिरोडा मतदारसंघात दीपक स्वतः निवडणूकच्या रिंगणात उतरले असून काँग्रेस उमेदवारही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मगोच्या या निर्णयाची राज्यभरात चर्चा आहे. मगोची या निवडणुकीतील भूमिका जाणून घेण्यासाठी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पक्षांतराला मगोचा कायम विरोध राहिला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. पक्षांतर करणारे केवळ लोकांचा नव्हे तर स्वतः चा विकास करतात. यासोबतच मगो भाजपसोबत सत्तेत होता तरीही 'चौकीदारांनी' मध्यरात्री आमचे आमदार चोरून नेले. त्यावर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवारांना पराभूत करणे हीच आमची यामागील रणनीती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details