महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'रंगनायकी' पाहून अत्याचारित मुलीला तक्रार करण्याची प्रेरणा हेच यश : दयाल पद्मनाभन

निर्भयाप्रकरणानंतर देशातल्या रुग्णालयांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि तपास यंत्रणेच्या कार्यात बदल करण्यात आला. 'रंगनायकी' या पटकथेमार्फत हे काल्पनिक प्रसंगातून मांडण्यात आले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर एका अत्याचार पीडितेला पोलिसांत तक्रार करण्याची प्रेरणा मिळाली, हेच मोठे यश आहे, असे मत 'रंगनायकी' या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक दयाल पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

dayal padmanabhan
आपल्या 'रंगनायकी' या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक दयाल पद्मनाभन

By

Published : Nov 26, 2019, 8:48 AM IST

पणजी -निर्भयाप्रकरणानंतर देशातल्या रुग्णालयांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि तपास यंत्रणेच्या कार्यात बदल करण्यात आला. 'रंगनायकी' या पटकथेमार्फत हे काल्पनिक प्रसंगातून मांडण्यात आले आहेत. जर आज ती असती तर तिचा अनुभव मांडण्याचा प्रयत्न असून तिच्याबाबत ही पटकथा तयार करण्याची प्रेरणा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका अत्याचार पीडितेला पोलिसांत तक्रार करण्याची प्रेरणा मिळाली, हेच मोठे यश आहे, असे मत 'रंगनायकी' या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक दयाल पद्मनाभन यांनी व्यक्त केले. ते भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मल्याळम चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मी रामकृष्णन, बंगाली चित्रपट दिग्दर्शक विकास चंद्रा, मराठी चित्रपट दिग्दर्शक आदित्य राठी आणि प्रिया पाटील उपस्थित होते.

आपल्या 'रंगनायकी' या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक दयाल पद्मनाभन

पद्मनाभन म्हणाले, रंगनायकी चित्रपट हा चित्रपट याच नावाने 1981 मध्ये बनविण्यात आला होता. हा चित्रपट मी त्या कलाकृतीला अर्पण करत आहे, कारण त्या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव राहिला आहे. आपल्याकडे सामाजिक अत्याचार विषयावरील चित्रपटात प्रामुख्याने बदला घेतला जातो असेच दाखवले जाते. परंतु, माझ्या चित्रपटात मी त्यासंदर्भातील सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका अत्याचार पिडीतेने आपल्यावरील अत्याचाराविरोधात तक्रार करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले, हाच मोठा पुरस्कार आहे. या चित्रपटासाठी जुन्याच गीतांना नव्या बाजात(रुपात) सादर करण्यात आले आहे.

हेही वाचा - सत्य आणि प्रामाणिकता यांचाच होत असतो विजय : प्रकाश झा
'होम ओनर' या मल्याळम चित्रपटाच्या दिग्दर्शिका लक्ष्मी रामकृष्णन म्हणाल्या, इफ्फीसाठी पहिल्यांदाच माझ्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. चेन्नईत 2015 मध्ये आलेल्या पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची ही कहाणी असून आज ते सांगण्यासाठी हयात नाहीत. आपल्या चित्रपटाविषयी बोलताना लक्ष्मी म्हणाल्या, चित्रपट क्षेत्रात महिलांनी मोठ्या संख्येने आले पाहिजे. कॅमेऱ्यामागे महिला मोठ्या प्रमाणात असतात. पुरुष आणि महिला अशा प्रकारे विभागणी नाही. परंतु, त्यामुळे आपले काम पुढे नेण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो असे त्या म्हणाल्या. तर 'माया' चित्रपटाचे दिग्दर्शक विकास चंद्रा आणि राठी यांनीही आपले अनुभव कथन केले.

हेही वाचा - मुलांच्या मनोरंजनासाठी ईफ्फी परिसरात आकर्षक 'चिल्ड्रन व्हिलेज'

ABOUT THE AUTHOR

...view details