पणजी (गोवा) - गोव्यात विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) प्रचार आता रंगात आलाय. राज्य व देशातील अनेक नेते गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण गोव्यात दाखल झाले ( Prithviraj Chavan in Goa ) असून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. काँग्रेसने समाजमाध्यमे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपली जोरदार जाहिरातबाजी सुरू केली आहे. ( Congress tops in Goa Assebmly Election camapign ) जाहिरातीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना मध्यवर्ती ठिकाणी स्थान देऊन प्रत्येक मुद्द्याला पद्धतशीरपणे मांडून गोव्यातील सर्व ज्वलंत विषयांना वाचा फोडण्यात आली आहे.
काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराने भाजपसह इतर पक्ष बॅकफूटवर -
काँग्रेसने यंदा आक्रमक पवित्रा घेत पद्धतशीर पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. टीव्ही, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रे, रेडिओ आणि विशेषतः गाण्याच्या माध्यमातून भाजप सरकारच्या समस्यांवर काँग्रेस भाष्य करत असल्यामुळे एक प्रकारे काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसची न्याय योजना -