पणजी - गोवा कोरोनामुक्त झाल्यामुळे गोवा सरकारने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याला विरोधी पक्ष काँग्रेसने आक्षेप घेत सरकारने याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
गोवा सरकारने दहावी-बारावी बोर्डाची घेण्यावर पुनर्विचार करावा; काँग्रेसची मागणी - Reconsideration news of Goa Board Exam
गोवा सरकारने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला असून याचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
गोवा विधानसभेचे प्रमुख विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या विषयी ट्विट करताना म्हटले आहे की, देशभरात कोविड-19 रोगाचे थैमान सुरू असताना गोवा सरकारने दहावी आणि बारवीची बोर्डाची परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे, त्यावर पुनर्विचार करावा. गोवा बोर्डाने याबाबत तज्ञांचे मत घ्यावे. तसेच परीक्षा घेण्याबाबत दुसरा पर्याय शोधावा. कोरोना आणि वाढती उष्णता असताना मुलांना परीक्षा देण्यास भाग पाडणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. यावरही कामत यांनी प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्री असताना दहा वर्षांपूर्वी याला मंजुरी देण्यात आली होती. हा माझ्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याकडे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी लक्ष लक्ष द्यावे, असे कामत म्हणाले.