महाराष्ट्र

maharashtra

Congress Leader Enters BJP - गोव्यात काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का

राज्यात 17 वरून जेमतेम 3 आमदार असणाऱ्या काँग्रेसची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचा बडा नेता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना (Congress Leader Enters BJP) पुन्हा एकदा उधाण आले आहे.

By

Published : Dec 9, 2021, 8:53 PM IST

Published : Dec 9, 2021, 8:53 PM IST

goa election
goa election

पणजी - भाजपने राज्यात काँग्रेस ला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक (Former CM Ravi Naik) यांच्यानंतर दक्षिण गोव्यातील आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर (Congress Leader Enters BJP) असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सदानंद तानावडेंची प्रतिक्रिया

राज्यात 17 वरून जेमतेम 3 आमदार असणाऱ्या काँग्रेसची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचा बडा नेता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना (Congress Leader Enters BJP) पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक (Former CM Ravi Naik Enters BJP) यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. यांच्यापाठोपाठ आणखी एक मुख्यमंत्री लवकरच भाजपात प्रवेश करणार असून याबाबत येत्या एक दोन दिवसांत याबाबतचा निर्णय शक्य असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.दरम्यान हा बडा नेता म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा -Goa Assembly Election 2022 : गोवा काँग्रेस लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार - पी. चिदंबरम

ABOUT THE AUTHOR

...view details