महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा पोटनिवडणूक : पणजीसाठी काँग्रेसची बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी - मनोहर पर्रिकर

गोवात्य पणजीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर...आठवड्यापूर्वीच गोवा फॉरवर्डचा राजीनामा देऊन मोन्सेरातांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश... माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनांनतर होत आहे पणजीची पोटनिवडणूक

पणजीसाठी काँग्रेसची बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी

By

Published : Apr 25, 2019, 4:34 PM IST

पणजी- गोवा विधानसभेच्या पणजी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आंतानसियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आठवड्यापूर्वीच त्यांनी गोवा फॉरवर्डचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. यासाठी सोमवार (२२ एप्रिल) ते २९ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भराण्याचा कालावधी आहे.


मोन्सेरात यांना २०१५ मध्ये पक्षविरोधी कारवाईमुळे काँग्रेसमधून नीलंबीत करण्यात आले होते. तर २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडून लढवली होती. त्यामध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे काही काळानंतर त्यांनी राज्य सरकारमधील घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला होता.


ऑक्टोबर २०१८ मध्ये शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे याठिकाणी रिक्त जागेवर मगोचे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर अडून राहिले होते. त्यामुळे सुदिन ढवळीकर यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. तसेच सत्तेत राहून घटक पक्षाविरोधात निवडणूक लढविण्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी वेळोवेळी आक्षेप नोंदवला होता.


या सर्व घडामोडीमुळे पणजी पोटनिवडणुकीत जेव्हा बाबूश मोन्सेरात यांनी निवडणूक लढविण्याचे घोषित केले. तेव्हा सरदेसाई कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढविण्याचे मोन्सेरात यांनी निश्चित केल्याने त्यांनी गोवा फॉरवर्डचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेस प्रवेश केला होता. मोन्सेरात यांनी काँग्रेस प्रवेश केल्यामुळे त्यांना पणजीची उमेदवारी जवळजवळ निश्चित होती. बुधवारी संध्याकाळी काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी उमेदवारी जाहीर करून त्यावर शिक्कामोर्तब केले.

ABOUT THE AUTHOR

...view details