पणजी - आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी लोबो भाजपा पक्षात आग्रही होते. मात्र, भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर लोबोंनी काँग्रेसची वाट धरली आणि अखेर काँग्रेसने ( Lobo Wife Get MLA Ticket In Shivoli Constituency ) त्यांची पत्नी व समर्थक उमेदवारांना तिकीट दिले आहे.
लोबो, केदार नाईकांना काँग्रेसचे तिकीट -
मायकल लोबो यांनी आपल्या पत्नीसह आपल्या समर्थक उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाने नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या लोबो यांनी काँग्रेस पक्षाची वाट धरली. तेव्हाच त्यांनी बरदेश मतदारसंघातील सर्वच जागा निवडून आणण्याची रणनीती आखली होती. त्यानुसार त्यांनी काँग्रेसकडे आपल्या समर्थकांना तिकीट देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने त्यांची मागणी मान्य करत म्हापसा मतदारसंघातून सुधीर कांडोलकर, सालिगव मधून केदार नाईक आणि शिवोलिमधून लोबो त्यांची पत्नी दलीयाना लोबो यांना तिकीट दिले आहे.
...म्हणून एकत्र आलो - केदार नाईक