महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समान संधी देण्यासाठी नवे ट्रान्सजेंडर विधेयक आणणार - अप्सरा रेड्डी - bill

ट्रान्सजेंडर एकाच घरात राहू शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. हे मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर ट्रान्सजेंडरना घर आणि वैद्यकीय सवलत देणार, असे रेड्डी म्हणाल्या.

समान संधी देण्यासाठी नवे ट्रान्सजेंडर विधेयक आणणार - अप्सरा रेड्डी

By

Published : May 8, 2019, 8:37 PM IST

पणजी - सध्याचे ट्रान्सजेंडर बिल मागे घेऊन नवे विधेयक आणणार. ज्यामुळे पोलीस आणि सशस्त्र दलाबरोबर सर्व सरकारी क्षेत्रात त्यांना समान संधी मिळेल. ज्यामुळे घर आणि शिक्षण यांचीही सोय होईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस अप्सरा रेड्डी यांनी आज पणजी येथे केले.

समान संधी देण्यासाठी नवे ट्रान्सजेंडर विधेयक आणणार - अप्सरा रेड्डी

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रेड्डी म्हणाल्या की, ट्रान्सजेंडर एकाच घरात राहू शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. हे मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे. आता पंतप्रधान मोदी यांची पायउतार होण्याची वेळ आली आहे. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर ट्रान्सजेंडरना घर आणि वैद्यकीय सवलत देणार.

रेड्डी म्हणाल्या, सध्या देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आत्ताचे वातावरण पाहता लोक 'प्रधानमंत्री हटाव' योजना बनवत आहेत. आजपर्यंत भाजपने जे काही केले ते खोटे असल्याचे समोर आले आहे.

सध्या गोव्यातही पणजी विधानसभेची पोटनिवडणूक सुरु आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणारे आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला आमदार म्हणून पुढे आणले आहे. महिला काँग्रेसही त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसही महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर विशेष आर्थिक क्षेत्रात महिलांसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा केली आहे.

खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे महिलांही रोजगाराला मुकल्या आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कायदेशीर खाणी सुरू करणार आहे. ज्यामुळे युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.

गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याचा समाचार रेड्डी यांनी घेतला. त्या म्हणाल्या, मंत्री युवकांच्या हाताला काम देण्याऐवजी शस्त्र देऊ इच्छितात. याद्वारे भितीदायक वातावरण निर्माण करण्याचा सरकारमधील घटकपक्ष प्रयत्न करत आहेत. सरकारही यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी गप्प आहे. त्यामुळे त्यांचाही त्याला पाठिंबा आहे असाच याचा अर्थ होतो.

या पत्रकार परिषदेसाठी गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सीमा फर्नांडिस, बिना नाईक आदी उपस्थित होत्या. यावेळी ' प्रियदर्शनी' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details