पणजी- निवडणूक प्रचार थांबून मतदानाला काही तासांचा अवधी असताना काँग्रेसने पत्रकार परिषद बोलावून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोवा भाजपने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
काँग्रेसने आचारसंहितेचे उल्लंघन केले; गोवा भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
काँग्रेसने कायदा माहिती असूनही जाणूनबुजून पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे असले प्रकार घडू नयेत, यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केल्यानंतर बोलताना भाजपच्या गाभा समितीचे सदस्य राजेंद्र आर्लेकर म्हणाले, काँग्रेसने कायदा माहिती असूनही जाणूनबुजून पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे असले प्रकार घडू नयेत, यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. अशा माध्यमातून काँग्रेस अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी.
निवडणूक आयोगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर केली आहे. यावर आम्ही आमचा अहवाल आयोगाला पाठवू, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी सांगितले.