पणजी - भाजपाच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यासाठी धमकवल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने ( Congress Allegation on BJP Minister ) केला आहे. मात्र सदर मंत्र्यांचे नाव घेण्यास काँग्रेसने नकार दिला.
मंत्रिमंडळातून हाकलून न लावल्यास काँग्रेस करणार तीव्र निषेध -
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार व महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलून न लावल्यास काँग्रेस याचा तीव्र निषेध करणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. 19 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत मात्र भाजपा नेत्याच्या या कृत्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्ध्या रस्त्यातूनच परत न जाण्याची वाईट वेळ भाजपाने आणू नये अशी खोचक टीकाही काँग्रेसने केली आहे.