महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवभारत निर्मितीकडे नेणारा केंद्रीय अर्थसंकल्प - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा नव भारत निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

प्रमोद सावंत

By

Published : Jul 5, 2019, 9:51 PM IST

गोवा - केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा नव भारत निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. अंत्योदयाला विचारात घेऊन बनवलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत


'महालक्ष्मी' या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, केंद्राने यावेळी हागणदारीमुक्तीवर विशेष भर दिला आहे. जे गोवा सरकारचेही लक्ष्य आहे. 31 जुलै 2019 पर्यंत गोवा हागणदारीमुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. या अर्थसंकल्पाचा विचार केला असता गाव, गरीब आणि शेतकरी यांना हा अर्थसंकल्प लाभदायक ठरणार आहे. ज्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
याच अर्थसंकल्पात केंद्राने देशभरातील 17 पर्यटन स्थळांची जागतिक दर्जाची स्थळे म्हणून निवड केली आहे. ज्यामध्ये गोव्यातील एक असेल अशी अपेक्षा आहे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, गोव्याने यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला नव्हता परंतु, यावेळी तो निश्चित घेतला जाणार आहे. तसेच गोव्यातील खाण, मोपा विमानतळ आणि रेल्वे संबंधीत अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.


सहकार क्षेत्राचा विकास करणार


गोव्यात हवा त्या प्रमाणात सहकारी क्षेत्राचा विकास झालेला नाही. त्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून 9 जुलै रोजी ताळगाव येथे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सहकारी क्षेत्रातील व्यवसायातून गोव्यात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे सहकारी तत्वावर व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार सहकार्य करणार आहे. यासाठी येत्या पंधरवड्यात सल्लागार नियुक्ती केली जाणार आहे. तर 'कपिला' हे गायीचे वाण मुळ गोमंतकीय आहे. ते पुन्हा गोव्यात कसे उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details