पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साद देत देशभर राबविल्या जाणाऱ्या टीका उत्सवाला पाळी-साखळी येथे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये यांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दिवसभरात पार पडलेल्या टीका उत्सवाचा आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन घेतला. राज्यभरात जनतेकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते टीका उत्सवाचे उद्घाटन - टीका उत्सवाबद्दल बातमी
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते टीका उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यभरात जनतेकडून या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुन्हा आढळले 500 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण -
गोव्यात मागील आठवड्यापासून कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज 500 हून अधिक आढळून येत आहे. रविवारी दिवसभरात 525 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामधील 57 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. 216 होमआयसोलेशन ठेवण्यात आले आहेत. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत म्रुत्यू झालेल्यांची संख्या 848 झाली आहे. मागील 24 तासांत 170 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 91.70 टक्के एवढा आहे.