महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विदेशात अडकलेल्या खलाशांना परत आणा; कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने - goa CM

देशभरातील खलाशांबरोबरच गोव्यातील सुमारे 7 ते 8 हजार खलाशी विदेशात अडकले आहेत. त्यांना गोव्यात परत आणावे, या मागणीसाठी आज आल्तीनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी खलाशांच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली. त्यामुळे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करून नंतर सोडून दिले.

विदेशात अडकलेल्या खलाशांना परत आणा
विदेशात अडकलेल्या खलाशांना परत आणा

By

Published : Apr 15, 2020, 4:37 PM IST

पणजी - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील खलाशांबरोबरच गोव्यातील सुमारे 7 ते 8 हजार खलाशी विदेशात अडकले आहेत. त्यांना गोव्यात परत आणावे, या मागणीसाठी आज आल्तीनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी खलाशांच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली. त्यामुळे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करून नंतर सोडून दिले.

जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार घातला आहे. भारत सरकारने लॉकडाऊनची घोषणा करत आता त्याची मुदतही 3 मेपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता विदेशात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी केंद्राकडे पाठपुरावा करावा म्हणून निदर्शन करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. परंतु, त्याने समाधान न झाल्याने पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हातामध्ये फलक घेत सामाजिक अंतराचे भान राखत निदर्शने केली. मात्र, 144 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना पणजी पोलिसांनी तेथून पोलीस स्थानकात आणून स्थानबद्ध केले. त्यानंतर आवश्यक कारवाई करत सोडून दिले.

विदेशात अडकलेल्या खलाशांना परत आणा

निदर्शनाविषयी बोलताना एका आंदोलक महिलेने सांगितले, की आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या मागणी विषयी विचारले असता प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. परंतु, ते कोणतेही ठोस आश्वासन देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला निदर्शने करावी लागली. जरी आज पोलिसांनी तेथून हटवले तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तसेच पुढे काय करायचे यावर विचार करत आहोत.

या आंदोलनाला पाठिंबा देणारे मेन्झी व्हिएगस म्हणाले, यामध्ये केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने लक्ष घालणे आवश्यक आहे. जे लोक जहाजावर अडकले ते कोणत्याही एका देशात नाहीत. सध्या गोमंतकीय मयामी बंदरानजीक जहाजावरच क्वारंटाईन आहेत आणि तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्या खलाशांना देशात परत आणावे, हिच आमची मागणी आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ग्रीनकॉरिडॉर बनवून त्यांना परत आणावे. निदर्शक खलाशी कुटुंबीयांना स्थानबद्ध केल्याप्रकरणी गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, खलाशांच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली आणि सरकारने त्यांना अटक केली. ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, 199 जहाजांवर 21 हजारांहून अधिक भारतीय आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. तसेच यामध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खलाशी कुटुंबीयांना दिलासा द्यावा.

ABOUT THE AUTHOR

...view details