लग्नापूर्वी नववधूने बजावला मताधिकार - goriesha
१०२ वर्षांच्या मारिया आंतनियो आज दुपारी यांनी मतदान केंद्र क्रमांक १५ वर आपला मतदानाचा हक्क बजावला. मारिया आणि गौरीशा वळवईकर यांचे मतदाने हे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

लग्नापूर्वी नववधूने बजावला मताधिकार
पणजी - पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. यावेळी नववधू गौरीशा वळवईकर यांनी लग्नसोहळ्यात जाण्याआगोदर मतदानाचा हक्क बजावला. पणजीतील मळा भागातील १६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर गौरीशा यांनी आई-वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला.
१०२ वर्षांच्या मारिया आंतनियो आज दुपारी यांनी मतदान केंद्र क्रमांक १५ वर आपला मतदानाचा हक्क बजावला. मारिया यांना त्यांच्या कुटुंबीय मतदानासाठी घेऊन आले होते. मारिया आणि गौरीशा वळवईकर यांचे मतदाने हे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.