महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यातील ब्रेन डेड युवकामुळे पाच जणांना जीवदान; राज्य सरकारकडून पालकांना 'मानपत्र' - body components donation in goa

रस्ता अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या छत्तीसगडच्या युवकामुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे. त्या युवकाच्या आईवडिलांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल गोवा सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज त्यांचे आभार मानले. त्यांना सरकारच्यावतीने मानपत्र देण्यात आले आहे.

vishwajit rane news
गोव्यातील ब्रेन डेड युवकामुळे पाच जणांना जीवदान; राज्य सरकारकडून पालकांना 'मानपत्र'

By

Published : Dec 10, 2020, 1:16 PM IST

पणजी - रस्ता अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या छत्तीसगडच्या युवकामुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे. त्या युवकाच्या आईवडिलांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल गोवा सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज त्यांचे आभार मानले. त्यांना सरकारच्यावतीने मानपत्र देण्यात आले आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि अन्य वैद्यकीय पथक उपस्थित होते.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आशिया खंडातील जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. यामध्ये एका ब्रेनडेड युवकाचे अवयव पाच गरजूंना दान करण्यात आले आहेत. याचा गोमेकॉला अभिमान आहे. परंतु, त्या युवकाच्या कुटुंबीयांसाठी दु:ख पचवणे खूपच जड जाणार आहे. माझ्याकडे सांत्वन करताना मंत्री म्हणून शब्द नाहीत. या अवयवांमुळे देशातील कोणत्याही भागातील गरजूला लाभ होऊ शकतो.

सोट्टो गोवा आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने ही ऐतिहासिक कामगिरी घडवून आणली. याला 'नवे जिवीत कार्यक्रम' म्हणून ओळखले जाते. याचा उद्देश अधिकाधिक अवयवयांचा उपयोग करणे. ज्यामुळे गरजूला लाभ होतील. यासाठी ऑक्टोबर 2019 पासून सोट्टो गोवा मध्यस्थ म्हणून काम पाहात आहेत. तर ब्रेनडेड सर्टिफिकेट कमिटीमध्ये गोमेकॉचे डॉक्टर, गोवा आरोग्य संचालनालयाचे डॉक्टर यांचे पथक असते. ज्या युवकामुळे हे घडून आले तो प्रद्युम्न सोनी (21 वर्षे) हा छत्तीसगडमधील युवक रस्ता अपघातात जखमी होऊन दि. 30 नोव्हेंबर रोजी गोमेकॉत उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, त्याचा शनिवारी ब्रेन डेड झाला.

यानंतर 'सोट्टो गोवा' ने त्याच्या नातेवाईकांना कल्पना देत अवयवय दानाविषयी माहिती दिली. ज्याला ते राजी झाले. त्यानंतर डॉ. तेरेसा परेरा आणि त्यांच्या पथकाने कायद्यानुसार तपासणी करून ब्रेन डेड झाल्याची खात्री करत प्रमाणपत्र दिले. गोमेकॉ आणि सोट्टो यांच्याकडील प्रतीक्षा यादीनुसार ह्रदय, फुफ्फुसे, यक्रुत आणि मुत्रपिंड आदी अवयव वितरित करण्यात आले.

हृदय मुंबईतील 59 वर्षीय रुग्णाला देण्यात आले. तर फुफ्फुसे कोविडमुळे बाधित झालेल्या 58 वर्षांच्या रुग्णाला, नागपूर येथील 59 वर्षांच्या रुग्णाला यकृत आणि गोव्यातील रुग्णाला मुत्रपिंड रोपण यशस्वीपणे करण्यात आले. यामुळे गोवा आता अवयवदानचा रोडमॅप बनण्यास सुरुवात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details