पणजी -सत्ता स्थापनेत पाठिंबा देण्यासाठी भाजपचे (BJP Leaders) अनेक केंद्रीय नेते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व उमेदवार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी भाजप हे विरोधी पक्षांवर ईडी, सीबीआयचा दबाव आणत आहे, असेही ते म्हणाले.
मी काँग्रेस पक्षाचा घटक -
मागची 10 वर्षे मी भाजपचा आमदार व मंत्री होतो. मात्र, माझी टर्म पूर्ण होताच मी भाजपच्या अंतर्गत वादाला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, भाजपचे बडे नेते माझ्याशी संपर्क करून पुन्हा पक्षात येण्याविषयी मला विनंत्या करतात, पण मी त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. कारण मी आता काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. त्यामुळे आता माझा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे लोबो यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.