पणजी -गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant Goa CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आमदार व केंद्रीय निरीक्षकांची महत्वाची बैठक आज पणजीत झाली. या बैठकीत प्रमोद सावंत हेच गोव्याचे मुख्यमंत्री असतील यावर एकमत झाले आहे. त्यानंतर लगेच भाजपने गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत सत्ता स्फानेसाठी दावा (BJP claim to form Government in Goa) केला आहे. यावेळी त्यांनी 25 आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सोपवले असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.
आता भाजप (BJP Goa) गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा (BJP claim to form government Goa) करणार आहे.
- आज करणार सत्ता स्थापनेचा दावा -
भाजप आपल्या तीन अपक्षांच्या मदतीने राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांची भेट भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, एल मुरुगण, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी टी रवी, प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच भाजपचे सर्व आमदार व तिन्ही अपक्ष उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी भाजप शिष्टमंडळाला शपथविधीसाठीची तारीख निश्चित करण्यास सांगितले आहे.
- कोण आहेत प्रमोद सावंत?