महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022: गोव्यात भाजपाने फोडला प्रचाराचा नारळ; जे.पी नड्डा यांनी दाखवला हिरवा कंदिल

राज्यात आता निवडणूकीचे वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे ( BJP Election Campaign ) आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी भाजपच्या संकल्प रथ ला हिरवा कंदील दाखवला आहे.

Goa Assembly Election 2022
गोवा विधानसभा निवडणूक

By

Published : Dec 24, 2021, 10:02 AM IST

पणजी - संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी 'संकल्प रथ'ला हिरवा कंदील ( BJP Election Campaign ) दाखवला आहे.

गोव्यात भाजपाने फोडला प्रचाराचा नारळ
थंडीतही राजकीय वातावरण गरम -


एकीकडे अवघे राज्य थंडीने गार पडले असताना राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राज्यात भाजपासह, काँग्रेस, आप आणि तृणमूलसह त्यांचे घटक पक्ष सध्या प्रचाराने राजकीय धुरळा उडवीत आहे. गुरुवारपासून भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपाने आपले संकल्प रथ तयार करून यांच्या माध्यमातून भाजपाचे कार्य जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने भाजपाने आपले 10 वर्षाचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. हे रिपोर्ट कार्ड नुकतेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.

भाजपाचा संकल्प रथ -

भाजपाने आपले कार्य आणि आगामी काळात जनतेकडून सल्ले मागण्यांसाठी प्रत्येक मतदारसंघात आपले संकल्प रथ फिरविण्यास सुरुवात केली आहे. या रथाला नड्डा यांनी नुकताच झेंडा दाखवला. या संकल्प रथात भाजपने एक संकल्प पेटी ठेवली असून याच्या माध्यमातून जनतेकडून त्यांची राज्यविषयी मते मागितली आहेत.

भाजपाची प्रचारात आघाडी -


दरम्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदारसंघात प्रचारास आघाडी घेतल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.

हेही वाचा -Mohammed Rafi B’day Special : दिवाना हुआ बादल...रफींच्या वाढदिवसानिमित्त ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ताज..

ABOUT THE AUTHOR

...view details