पणजी - भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी रविवारपासून भाजपचे दिग्गज नेत्यांचा प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. यामध्ये बॉलिवुडची चित्रपट अभिनेत्री ईशा कोप्पीकरचाही समावेश आहे.
गोव्यात रविवारपासून भाजप नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका; ईशा कोप्पीकरही प्रचारात - election
अभिनेत्री कोप्पीकर रविवारी (१४) चिंबल, झुआरीनगर आणि बायणा येथे प्रचार करणार आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर दक्षिण गोव्यातील सांगे आणि केपे येथे लोकांशी संवाद साधणार आहेत.

१६ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची पेडणे येथे जाहीर सभा होणार आहे. तर साडेसहा वाजता पर्वरी मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. १७ एप्रिलला केंद्रीय भुप्रृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी मांद्रे, डिचोली आणि म्हापसा येथे प्रचारसभा घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० एप्रिलला दक्षिण गोव्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी दोन सभा घेणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता साखळीमध्ये तर रात्री ८ वाजता वास्को मार्केट जवळ प्रचारसभा घेतील आणि १० वाजता दाबोळी विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.