महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मुख्यमंत्री पदाबाबत फालतू प्रश्न मला विचारू नका' - विश्वजित राणे - मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण

मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत आहे का? असले फालतू प्रश्न मला विचारु नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेत्यांना विचारा अश्या शब्दात राणे यांनी आपली नाराजी ( BJP Leader vishwajit rane about cm candidate ) व्यक्त केली. कालच केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळेच डॉ. विश्वजित राणे भाजपात नाराज आहेत का असा सवाल केला जात आहे.

vishwajit rane in goa about cm candidate
विश्वजित राणे

By

Published : Mar 17, 2022, 3:00 PM IST

पणजी (गोवा) -मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत आहे का? असले फालतू प्रश्न मला विचारु नका, मी इथे माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेत्यांना विचारा अश्या शब्दात राणे यांनी आपली नाराजी ( BJP Leader vishwajit rane about cm candidate ) व्यक्त केली. कालच केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळेच डॉ. विश्वजित राणे भाजपात नाराज आहेत का असा सवाल केला जात आहे.

विश्वजीत राणे यांची प्रतिक्रिया

मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण -

काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सकाळी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, पणजीचे आमदार बाबुश मोंसरात व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी परत भाजप नेते प्रमोद सावंत ( Re election Pramod Sawant Goa cm post ) यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाली आहे. त्यानंतर आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. आता महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.

हेही वाचा -Love Horoscope 17 March : कोणत्या राशीवाल्यांना आजचा दिवस प्रणयासाठी आहे अनुकूल? जाणून घ्या लव्ह राशीफळ

ही नावे आहे चर्चेत -

डॉ. सावंत यांच्यासोबत मंत्रिमंडळात डॉ. विश्वजीत राणे, निलेश काब्राल, मौविन गोडिन्हो, गोविंद गावडे, रोहन खवटे, सुभाष शिरोडकर, रवी नाईक, बाबुश मोंसरात यांच्यासोबत अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच महाराष्ट्र वादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

दरम्यान डॉ. सावंत यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरा डॉ. सावंत गोव्यात दाखल झाले, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या परिस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला.

राणे आणि सावंत यांच्यात काहीही वाद नाही - प्रदेशाध्यक्ष

डॉ. सावंत यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड देखील दिल्लीतून गोव्यात दाखल झाले. दरम्यान तानावडे यांना डॉ. सावंत आणि विश्वजीत राणे यांच्या अंतर्गत वादविषयी विचारले असता सगळे आलबेल असल्याचे त्यांनी सांगितले.

ेही वाचा -Pramod Sawant : 2024 सालीही केंद्रात मोदी सरकार असणार - प्रमोद सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details