पणजी (गोवा)- राज्यात महाराष्ट्र गोमंतक ( Maharashtra Geomantic ) पक्षाने आपले उमेदवार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना लॉकरमध्ये ठेवावे, असा खोचक टोला सदानंद तानावडे यांनी मगोला लगावला आहे. भाजपा आपले उमेदवार पळवत आहे, असा आरोप नुकताच मगोने केला होता.
तृणमूलच्या युतीने मगो कार्यकर्ते अस्वस्थ -
यंदाच्या निवडणुकीत ( Goa Election 2022 ) महाराष्ट्र गोमंतक पक्षाने तृणमुल काँग्रेस पक्षासोबत युती ( TMC Mago Allince ) केली आहे. मात्र, राज्यात स्वातंत्र्यापासून असणाऱ्या या पक्षाचे या युतीमुळे महत्त्व कमी होत असल्याचे दिसत आहे. परिणामी या पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची समजूत काढण्याचे काम पक्षाचे नेते करत आहेत. त्यातच काही कार्यकर्ते नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. म्हणून महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपवर त्यांचे उमेदवार चोरत असल्याचा आरोप केला आहे.