पणजी (गोवा)- गोवा मुक्तीसंग्रामची सुरुवात, गोव्यातील सर्वात हिंदुबहुल प्रदेश म्हणजे डिचोली ( Bicholim Assembly Constituency ). डिचोली तालुका हा खाणकामाच्या विळख्यात अडकलेला तालुका, वर्षानुवर्षे हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
मतदारसंघातील राजकीय विद्यमान परिस्थिती
1994 नंतर या मतदारसंघात एकदाही काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही. मगो किंवा भाजपचाच उमेदवार या मतदारसंघात विजयी झालेला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजप व मगो यांच्यात कडवी लढत झाली होती. मगोचे नरेश सावळ यांचा अवघ्या काही मतांनी पराभव करण्यात पाटणेकर यांना यश आले होते. यावेळीही राजेश पाटणेकर व मगोचे नरेश सावळ यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. काँग्रेस पक्ष डिचोलीत बराच कमकुवत आहे. तसेच काँग्रेसकडे प्रभावशाली उमेदवारही नाही. मेघश्याम राऊत यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
2017 ची विधानसभा निवडणूक
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राजेश पाटनेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे उमेदवार नरेश सावळ यांचा पराभव केला. पाटनेकर यांना त्या निवडणुकीत 10 हजार 645 तर 9 हजार 988 मते मिळाली होती. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार तथा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर हे करत आहेत.
मतदारसंघातील समस्या