पणजी (गोवा) - भाजपने आपल्या उर्वरित 6 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने या आधी आपल्या 34 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केलेले उमेदवार आणि मतदारसंघ
कुंभारजुवे - जनीता माडकाईकर
बिचोली - राजेश पाटनेकर
कुडतरी- अँथनी बारबोझा
सांताक्रूझ- अँथनी फर्नाडिस
कळणगुट - जोसेफ सिक्वेरा
कुट्टहाळी - ननारायण नाईक
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला तिकीट नाकारले -
कुंभारजुवे मतदारसंघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा मुलगा सिद्धेश नाईक इच्छुक होते. मात्र, उत्पल पर्रीकर यांना जो नियम लागू केला त्याच तत्त्वावर भाजपने सिद्धेश यांना डावलून आमदार पांडुरंग माडकाईकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. सिद्धेश यांच्या उमेदवारीसाठी श्रीपाद यांनी दिल्लीत प्रयत्न करूनही पक्षाने त्यांची मागणी मान्य केलेली नाही. तर नुकत्याच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या मंत्री मायकल लोबो यांच्या जागेवर कळणगुट मधून जोसेफ सिक्वेरा याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने उर्वरित सहा मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर केले आहेत. यामध्ये कुंभारजुवे मतदारसंघातून जनिता पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी आहेत.
निवडून आल्यावर भाजपमध्ये न जाण्याची हमी दिल्यास उत्पल पर्रीकरांना शिवसेना पाठिंबा देणार - उदय सामंत
पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणारे मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी निवडून आल्यावर भाजपात (BJP) न जाण्याचे आश्वासन दिले तर शिवसेना (Shivsena) त्यांना आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सांगितले आहे. मागच्या काही दिवसांपासून गोवा राज्याचे लक्ष पणजी मतदारसंघाकडे लागले आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे हा विषय सध्या केंद्रस्थानी आहे. पर्रीकर यांनी त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वच पक्षांनी पर्रीकर याना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेने पणजीतूनच शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.