पणजी (गोवा) -कोविडमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अशा नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे 2 लाखाची मदत करण्यात आली आहे. या मदतीचे धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पीडितांच्या कुटुंबीयांना बुधवारी सुपूर्त करण्यात आले. तसेच कोविड काळात उत्पनाचे साधन नसणाऱ्या नागरिकांनाही ५ हजार रुपयांची मदत सरकारतर्फे करण्यात आली. बुधवारी पणजीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक तसेच या खात्याचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे कॉंग्रेसला प्रत्युत्तर -
काँग्रेस सरकारच्या काळात राज्याची तिजोरी ओसंडून वाहत असताना आलेल्या संकटात सरकारने नागरिकांना तुटपुंजी मदत केली. मात्र, कोविड काळात सरकारचे उत्पन्न ९० टक्क्यांनी घसरले तरी देखील सरकार पीडितांना मदत करत आहे आणि ही मदत काँग्रेसच्या सरकारपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे सरकार करत असलेल्या मदतीची खिल्ली उडविण्यापूर्वी आपण काय केले याचा तपास काँग्रेसने करावा असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना दिले आहे.
तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक खर्च -