पणजी - विज्ञान आणि वेद वेगळे समजण्याचे कारण नाही. चारही वेद हे विज्ञानच आहे. म्हणून हिंदूधर्माची मान्यता विज्ञाननिष्ठ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी रविवारी दोनापावल येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा यांच्याकडून दोनापावल येथील सागरविज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या 'विश्वगुरू भारत : आरएसएसच्या दृष्टीकोनातून' या विषयावरील व्याख्यानात जोशी बोलत होते.
'विश्वगुरू भारत : आरएसएसच्या दृष्टीकोनातून' या व्याख्यानात बोलताना सरकार्यवाह भय्याजी जोशी... हेही वाचा... 'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना भय्याजी जोशी यांनी उत्तरे दिली. 'स्वतंत्र भारतात सर्वकाही करता येऊ शकते. सरकार जनतेच्या भावना समजून काम करते. परंतु, काही वेळा लोकभावना नव्हे तर देशहित विचारात घ्यायला हवे. ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक होते. प्रत्येक विद्यालयात संस्कृत शिक्षण दिले पाहिजे. ज्यामुळे नैतिकतेचे धडे मिळतील' असे भय्याजी जोशी यावेळी म्हणाले.
हेही वाचा... 'मंत्रालयात बसून आपल्या वेदना मी समजू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलोय'
हिंदू हा समाजजीवनासाठी आचारधर्म आहे. विज्ञान आणि वेद वेगळे नाहीत. चारही वेद विज्ञान आहे. त्यामुळे धर्माची मान्यता विज्ञाननिष्ठ दिसते, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले. तसेच कालबाह्य गोष्टी ह्या निसर्ग आपोआपच नष्ट करत असतो. हिंदू कालसुसंगत जीवनशैली आहे. देशात जर एकच पंथ राहिला तर तो संप्रदाय बनेल. हिंदू राहणार नाही. त्याबरोबरच जेव्हा लोक भारताला समजू लागतील तेव्हा समस्या आपोआपच कमी होतील. श्रद्धा तर्काने शिकवली जाऊ शकत नाही, असेही भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'आय अॅम फॉर अल्लेप्पी' : केरळमधील पूरग्रस्तांना रामोजी समुहाने 121 घरे दिली बांधून
भारत विश्वगुरू कसा बनले? याचे विश्लेषण करताना जोशी म्हणाले की, हिंदू समिती म्हणजे भाजप नव्हे. राजकीय संघर्ष सुरूच राहणार. हिंदूत्वाचा विरोध आणि समर्थन हे राजकीय आहे. यातून समाजाने बाहेर आले पाहिजे. भारताला विश्वगुरू बनण्यासाठी राजकारणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्राचे प्रकट स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संचालक लक्ष्मण बेहरे आणि सहसंचालक बाबा चांदेकर उपस्थित होते.