महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घरपोच जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट व्यतिरिक्त अन्य सर्व हालचालींना दक्षिण गोव्यात बंदी - goa hotel begin

घरपोच जेवण देणे अथवा पार्सल सेवा देण्याच्या अटींवरच दक्षिण गोव्यात काही रेस्टॉरंटना परवानगी देण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश दक्षिण गोवा न्यायदंडाधिकारी यांनी जारी केला आहे.

goa cm
गोवा मुख्यमंत्री

By

Published : Apr 26, 2020, 11:14 PM IST

पणजी - घरपोच जेवण देणे अथवा पार्सल सेवा देण्याच्या अटींवरच दक्षिण गोव्यात काही रेस्टॉरंटना परवानगी देण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश दक्षिण गोवा न्यायदंडाधिकारी यांनी जारी केला आहे. मुख्य म्हणजे दक्षिण गोव्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे हा जिल्हा ग्रीनझोनमध्ये आहे.

आदेशात म्हटले आहे की, कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्याची आणिबाणी निर्माण झाली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत दक्षिण गोव्यात रेस्टॉरंट, चहा अथवा पान टपरी, धाबे, फेरीवाले, किनारी शँक्स, खाणावळी, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, खाजगी आणि सार्वजनिक सभागृहे, कँसिनो, स्पा, मसाज पार्लर, सलून, हॉटेल्स आणि मद्यविक्री यावर बंदी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details