पणजी -राज्यात काँग्रेस पक्षाची पडझड ( Goa Congress ) सुरू झाली आहे. काल सोमवारी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड ( Alex Reginald Resign ) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. रेजिनाल्ड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे काँग्रेस ( Alex Reginald Left Congress ) मोठा धक्का बसला आहे. रेजिनाल्ड यांना काँग्रेसने नुकतीच त्यांच्या कुडतरी मतदारसंघातून उमेदवारी ही जाहीर केली होती.
'गोव्याच्या भविष्यासाठी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश'-
दरम्यान रेजिनाल्ड यांनी रात्री महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यासोबत कोलकाता गाठले आणि आज सकाळी तृणमुल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमुलमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाला राज्यात भवितव्य नाही. तसेच हा पक्ष राज्याच्या प्रश्नावर गंभीरपणे लक्ष देत नाही म्हणून आपण गोव्याच्या भविष्यासाठी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले.