पणजी - गोवा मनोरंजन संस्थेच्या (इएसजी) पणजीतील मल्टिप्लेक्स दुरुस्तीला एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे. यासंबंधी दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट आयनॉक्सला मिळाले आहे. तसेच येथील चारही चित्रपटगृहांचा आयनॉक्ससोबतचा करार पुढील 15 वर्षांसाठी वाढवण्यात आल्याची माहिती इएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. यावेळी कार्यकारी अधिकारी अमित सतिजा उपस्थित होते. 2004 मध्ये या मल्टिप्लेक्सची उभारणी केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.
त्या वेळी दरमहिना 20 लाख रुपये भाडे मिळत होते. आता ही किंमत 54 लाखांपर्यंत पोहोचली आहे. नव्या करारानुसार दरवर्षी 5 टक्के भाडेवाढ होणार आहे. कोणत्याही प्रकारची मोडतोड न करता एप्रिलपासून दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढून ठेकेदार कंपनी निवडण्यात आली.