महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पणजी : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे आझाद मैदानात मौन आंदोलन - panji congress agitation

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी पणजीतील आझाद मैदानावर मौनव्रत आंदोलना करत, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या आंदोलनात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पी चिदम्बरम व अन्य बडे नेते सहभागी झाले होते.

काँग्रेसचे आझाद मैदानात मौन आंदोलन
काँग्रेसचे आझाद मैदानात मौन आंदोलन

By

Published : Oct 12, 2021, 9:05 AM IST

पणजी - उत्तर प्रदेशातील लखीमपूर प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. सोमवारी काँग्रेसने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी देशभर मौंनव्रत आंदोलन केले. राजधानी पणजीतील आझाद मैदानावर माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मौंनव्रत आंदोलंन केले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोदनकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सर्दीन, आमदार तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व महिल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आरोपींच्या अटकेची केली मागणी -

यावेळी काँग्रेसने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करत या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी काँग्रेसने लाऊन धरत केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध केला. मागच्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस अधिकच आक्रमक पवित्रा घेत आहे. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विविध राजकीय, सामाजिक विषय घेऊन काँग्रेस राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करत आहे. आजच्याही मौंनव्रत आंदोलनाला असेच राजकीय स्वरूप देण्यास काँग्रेस यशस्वी झाली.

हेही वाचा -मंदिरे सुरू होऊनही पूजा साहित्य विक्रेत्यांचे होताहेत हाल

ABOUT THE AUTHOR

...view details