महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sadanand Tanavade : 'त्या' काँग्रेस आमदारानंतर गोवा भाजपमधली अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर - मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ( Former Chief Minister Digambar Kamat ) यांच्यासह अन्य सहा आमदारांना भाजपने पक्षात प्रवेश दिला खरा, मात्र आता भाजपातली अंतर्गत धुसफूस बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. या काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे त्या मतदारसंघातील माजी आमदार यांच्यासह माजी उमेदवारही नाराज आहेत.( Congress MLA The Internal Displeasure In The BJP Is On The Rise )

Sadanand  Tanavade
भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

By

Published : Sep 15, 2022, 5:21 PM IST

पणजी - माझी विरोधी पक्षनेते मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ( Former Chief Minister Digambar Kamat ) यांच्यासह अन्य सहा आमदारांना भाजपने पक्षात प्रवेश दिला खरा, मात्र आता भाजपातली अंतर्गत धुसफूस बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. या काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे त्या मतदारसंघातील माजी आमदार यांच्यासह माजी उमेदवारही नाराज आहेत. आता तर त्याच्यात भर पडली आहे ते राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ( Sadanand Shet Tanavade ) यांची. केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली म्हणूनच या आमदारांना भाजपात प्रवेश दिला आहे. मात्र या आमदारांच्या भाजपा प्रवेशावर आपण असमाधानी असल्याचं तानावडे यांनी सांगितलं. जर माझ्या हातात असतं तर यांचा पक्षप्रवेश मी नक्कीच नाकारला असता असेही तानवडे पुढे म्हणाले. ( Congress MLA The Internal Displeasure In The BJP Is On The Rise )

त्या काँग्रेस आमदारानंतर भाजप मधली अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर



काँग्रेस आमदारांच्या पक्ष प्रवेशामुळे मंत्री विश्वजीत राणे नाराज -काँग्रेसच्या आमदार आणि भाजपा प्रवेश केल्यामुळे मंत्री विश्वजीत राणे यांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसापासून राणे यांनी मायकल लोगो यांच्या विरोधात मागच्या काही दिवसांपासून कायदेशीर कारवाया सुरू केल्या होत्या मात्र आता खुद्द लोबो आणि त्यांची पत्नी डीलायला यांच्यासह अन्य सहा आमदार भाजपात आल्यामुळे विश्वजीत राणे यांची फार मोठी कोंडी झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांची बाजू वरचढ ठरली आहे. दरम्यान काँग्रेस आमदारांच्या या भाजपा प्रवेशामुळे मंत्री विश्वजीत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त करत माझ्यासोबत अद्यापही माझे वरिष्ठ असल्याचं राणे यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details