बागा (पणजी) - कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.
मागच्या बुधवारपासून होते गोव्यात -
पुण्यातील शुभम देडगे आणि ईश्वरी देशपांडे हे मागच्या बुधवारपासून गोव्यात फिरायला आले होते. सोमवारी पहाटे पार्टी करून परतत असताना त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट खाडीत कोसळली. नेमकी याच वेळी भरतीची वेळ असल्यामुळे गाडी खोल पाण्यात कोसळल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ईश्वरी देशपांडे हिने अलीकडेच एका मराठी व हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.
हेही वाचा -पोलिसांचा लॉजवर छापा; रुमधील टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला, पाहा VIDEO