हैदराबाद - गोव्यात विविध मतदारसंघात अटीतटीचे सामने ( goa election 2022 ) झालेत. यामध्ये काही मतदारसंघात तर उमेदवार हे अवघ्या 76 आणि 77 मतांनी विजयी झाले आहेत. काट्यांची कट्टर झालेल्या मतदार संघामध्ये फोंडा हा आहे. सर्वात अटीतटीचा सामना हा महाराष्ट्रवादी गोमंतक आणि भाजपा उमेदवारात या मतदारसंघात झाला आहे.
प्रतिनिधीने घेतलेला आढावा हे मुख्य मतदारसंघ आहेत. तर अवघ्या 500 मतांनी विजयी झालेले हे काही उमेदवार आहेत.
1) बिचोलिम येथील अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्टे आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नरेश राजाराम सावल यांच्यात चांगलीच काट्याची टक्कर झाली. निवडणुकीच्या अटीतटीच्या सामन्यात सावल यांनी 456 मतांनी पराभूत करत शेट्टे यांनी विजय मिळवला आहे.
2) नावेलिम या मतदार संघात भाजपा उमेदवार उल्हास तुएनकर यांनी तृणमूल काँग्रेसचे वलंका नताशा आलेमाओ यांना 430 मतांनी हारवले आहे.
3) फोंडा मतदारसंघात सर्वात अटीतटीचा सामना हा महाराष्ट्रवादी गोमंतक आणि भाजपा उमेदवारात झाला आहे. येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार केतन प्रभू भाटीकर यांना 7437 तर भाजपाचे रवी नाईक यांना 7514 मते पडली आहेत. भाटीकर यांचावर भाजपाचे नाईक यांनी अवघ्या 77 मतांनी विजय मिळवला आहे.
4) प्रिओल मतदार संघात भाजपा उमेदवार गोविंद शेपू गावडे यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पांडुरंग उर्फ दीपक ढवळीकर यांचा 213 मतांनी पराभव केला. गावडे यांना 11019 पडलेली आहेत.
5) सेंट आंद्रे या मतदार संघाचा निकाल हा खूप रोमांचक पद्धतीने लागला आहे. विजयासाठी भाजपा उमेदवार आणि क्रांतीकारी गोवा पक्षाने देव पाण्यात ठेवले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या अटीतटीच्या सामन्यात भाजपाचे फ्रान्सिस्को सिल्वेरा यांचा क्रांतिकारी गोवा पक्षाचे वीरेश मुकेश बोरकर यांनी अवघ्या 76 मतांनी पराभव केला आहे. बोरकर यांना 5395 मते पडलेली आहेत.
6) वेलीम मतदार संघातून आपचे उमेदवार क्रुझ सिल्वा हे विजयी झाले आहेत. अगदी तोडीस तोड झालेल्या या सामन्यात आम आदमी पार्टीचे सिल्वा यांनी कॉंग्रेसचे डिसिल्वा सॅव्हियो यांचा 169 मतांनी पराभव केला. सिल्वा यांना 5390 मते पडलेली आहेत.