महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कर्नाटकला दिलेल्या पत्राला तात्पुरती स्थगिती म्हणजे गोमंतकीयांचे केवळ सांत्वन - गोवा फॉरवर्ड पक्ष

म्हादई नदी संबंधात कर्नाटकला दिलेल्या पत्राला तात्पुरती स्थगिती दिली गेली आहे. ही स्थगिती देणे म्हणजे नाताळ आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने सांत्वन करण्याचा प्रकार आहे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

Aarti of the Mhadei River through the Progressive Front of Goa
प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा यांच्या मार्फत म्हादई नदीची आरती

By

Published : Dec 19, 2019, 2:15 PM IST

पणजी -केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने म्हादई संबंधात कर्नाटकला दिलेल्या पत्राला तात्पुरती स्थगिती दिली गेली आहे. ही स्थगिती देणे म्हणजे नाताळ आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने सांत्वन करण्याचा प्रकार आहे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. बुधवारी प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा यांच्या मार्फत आयोजित केलेल्या म्हादई नदी (मांडवी) किनाऱ्यावरील आरतीसाठी ते उपस्थित होते.

प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा यांच्या मार्फत म्हादई नदीची आरती...

हेही वाचा... बाळासाहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेचं कारण....

सरदेसाई यावेळी म्हणाले, केंद्राने कर्नाटकला पर्यावर ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. 4 नोव्हेंबरला सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी आम्ही उपस्थित होतो. सदर पत्र स्थगित नव्हे रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यावर दीड महिन्यानंतर उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे म्हादई पाणीवापट प्रश्नाकडे संशयाने पाहणे साहजिकच आहे. तरीही सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

हेही वाचा... अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार

मुळात कर्नाटकने केंद्राला दिलेले पत्र हाच मोठा घोटाळा आहे. असे यापूर्वीच आम्ही असे म्हटले आहे. असे सांगून सरदेसाई म्हणाले की, नाताळ आणि नववर्ष गोमंतकीयांना चांगले जावे यासाठी हा निर्णय आहे. परंतु, जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत गोव्याची जीवनदायीनी असलेल्या म्हादई नदीची दक्षता घेणे गरजेचे आहे. या विषयातील गुंतागुंत पाहता राज्य असो वा केंद्र सरकार यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून प्रत्यक्ष घटनास्थळी काय स्थिती आहे, हे पाहून निर्णय घेतला पाहिजे.

हेही वाचा... विद्यार्थ्यांवर हल्ला हे गृहमंत्रालयाचे अपयश; खासदार सुप्रिया सुळे

आंदोलनाविषयी बोलताना फ्रंटचे अध्यक्ष ह्रदयनाथ शिरोडकर म्हणाले, म्हादई वाचवण्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आमचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. पण आजच केंद्राने कर्नाटकला दिलेल्या पत्राला स्थगित केले आहे. परंतु, हे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे नव्हे. तर गोव्याचे नवे राज्यपाल यांनी पंतप्रधान यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेमुळे झाले आहे. सरकारने आमच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. आजचे पत्र म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो. त्याचबरोबर राज्यपालांच्या भूमाकेचेही स्वागत करतो. यावेळी आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर यांच्यासह गोव फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details