पणजी- शहराचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा राखून ठेवण्यासाठी आपच्या विकास मॉडेलची गरज आहे. यासाठी आम आदमी पक्ष पणजी पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा करत आहे, असे मत आपचे गोव्यातील नेते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी व्यक्त केले.
'पणजीचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा राखून ठेवण्यासाठी 'आप'च्या विकास मॉडेलची गरज' - माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी १९ मे रोजी मतदान होणार आहे. वाल्मिकी नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची डॉ. रिबेलो उपस्थित होते.

डॉ. रिबेलो म्हणाले, भाजप आणि काँग्रेसने विकासाच्या नावाखाली अमर्यादित अशी येथील साधनसंपत्ती आणि नैसर्गिक स्रोतांचा नाश केला. हे थांबविण्यासाठी आणि वारसा स्थळांचे जतन करून सुंदर गोवा राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी आम आदमी पक्षातर्फे उमेदवार उभा केला जात आहे. तर, पक्षाचे संयोजक एल्वीस गोम्स म्हणाले, या निवडणुकीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून ते ती चांगल्या पद्धतीने पार पाडतील.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी १९ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (शुक्रवार) चौथा दिवस होता. यावेळी वाल्मिकी नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची डॉ. रिबेलो उपस्थित होते. आपने पणजी विधानसभेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या वाल्मिकी नाईक यांनाच पोटनिवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी दिली आहे. यावेळी आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स, सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर आणि पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.