पणजी -गोव्यात निवडणूक प्रचार ( Goa Assembly Election 2022 ) जोर धरत आहे. याच प्राश्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ( CM Arvind Kejriwal ) प्रचारात उडी घेतली आहे. दिल्लीप्रमाणे गोव्यातही विकास करण्यासाठी गोव्यातील जनतेने एकदा संधी द्यावी, अशी मागणी केजरीवाल ( CM Arvind Kejriwal Election campaign In Goa ) यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी 13 कलमी ( AAP Promises To Goa People ) कार्यक्रमही जाहीर केला आहे.
गोव्यासाठी आपचा 13 कलमी कार्यक्रम -
गोव्याचा विकास करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी 13 आश्वासने ( AAP Promises To Goa People ) दिली आहेत. यामध्ये मोफत वीज आणि पाणी, उत्तम रस्ते, राज्यातील मायनिग पुन्हा एकदा सुरू करणे, महिलांना प्रतिमाह 3000 हजार रुपये भत्ता, मोफत उपचार, मोफत शिक्षण, राज्यात महिला सुरक्षा, टूरिझमला चालना, आदी आश्वासनांचा यात समावेश आहे.
'...तर प्रत्येकाला 2 लाख रुपये मिळणार' -
दिल्लीप्रमाणे राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास विविध योजनांतून गोव्यातील जनतेला 2 लाख रुपयांचा फायदा होणार असून, 5 वर्षात प्रत्येकाला 10 लाख रुपये मिळणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत आपण भ्रष्टाचार मुक्त राज्यकारभार करत आहोत. त्यामुळेच केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या साहाय्यानं आपल्या 21 आमदारांची पोलीस चौकशी केली, त्यातून त्यांना काही ही साध्य झाले नाही. हीच तर आपल्या कामाची पोहोचपवती असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
काँग्रेसवर साधला निशाणा -
काँग्रेस पक्ष राज्यात आमदार निवडून आणण्यासाठी जनतेकडे मत मागत आहेत. मात्र, जनतेने निवडून आणलेले आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळेच आपण कोणासाठी मते मागत आहोत. काँग्रेस की भाजपा? याचे उत्तर काँग्रेस पक्षाने द्यावे, असे सांगत केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. दरम्यान, वेळ पडल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा -Covid tracker India : भारतात 2.71 लाख नवीन कोरोना रुग्ण;सकारात्मकता दर कमी