पणजी - 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवार (दि.16) ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुदीप संजीव (सुदीप) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, यावर्षीचा इफ्फी हायब्रीड पद्धतीने होणार आहे. ज्यामुळे रसिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काहींना ऑनलाइन पद्धतीने याचा आस्वाद घेता येणार आहे. यावर्षी 16 देश सहभागी झाले आहेत. 7 चित्रपटगृहात 159 चित्रपट दाखवले जातील. ज्यामध्ये 85 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रीमियर असतील. कंट्रीफोकस म्हणून बांगलादेशचा सहभाग आहे. जीवनगौरव पुरस्कार इटालियन कलाकार व्हिकेरिजल स्टुरिओ यांना प्रदान करण्यात येईल. महोत्सवात गर्दी टाळण्यासाठी केवळ 950 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय ग्रुहमंत्रालयाने जारी केलेल्या महामारी संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात येईल. मास्क शिवाय कोणालाही प्रवेश नसेल.
ओपनिंग राऊंडने पडदा उठेल